Thu, Jul 18, 2019 06:07होमपेज › Kolhapur › दत्त भिक्षालिंग मंदिरात दत्तजयंती उत्सव

दत्त भिक्षालिंग मंदिरात दत्तजयंती उत्सव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांचे वतीने श्री दत्त भिक्षालिंग स्थान, आझाद चौक येथे दत्तजयंती सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. 
उत्सवामध्ये रविवार 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीं चा जन्मकाळ सोहळा व रात्री 8 वाजता पालखी सोहळा आहे. सोमवार (दि. 4)  नगरप्रदक्षिणा व दुपारनंतर महाप्रसाद असून अनेक धार्मिक व सांस्कृतिक  कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले आहे. दररोज श्रीस रूद्राभिषेक, श्रीगुरुचरित्र वाचन, महापूजा व आरती, श्री. तांबे गुरुजी यांचे पुराण वाचन, गजानन बुवा वाठारकर यांचे कीर्तन, रात्री आरती, जप, भजन, भावगीते, गायन आदी धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही आयोजन केले असून त्यामध्ये बुधवार (दि.29), शब्द सुरांच्या झुल्यावर कार्यक्रम, गुरुवार (दि.30) झंकार ऑर्केस्ट्रा प्रस्तुत भाव, भक्तिगीते, शुक्रवार (दि.1) नाद सुरमयी, शनिवार (दि.2) स्वर मोहिनी, रविवार 3 रोजी हिटस् बिटस् आदी कार्यक्रम रात्री 9 वाजता आयोजित केले आहेत. असे श्रीदत्त भिक्षालिंग देवस्थान यांचे वतीने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.