Tue, Mar 26, 2019 20:07होमपेज › Kolhapur › वाळू उपसा बंदीमुळे बांधकामे ठप्प

वाळू उपसा बंदीमुळे बांधकामे ठप्प

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

वाळू उपशावर हरित लवाद व शासनाने बंदी आणली आहे. महसूल खात्याने चोरट्या  वाळूवरही सातत्याने अंकुश ठेवला आहे. यामुळे वाळू उपशाचे ठेके पूर्णपणे बंद  आहेत. परिणामी, बांधकामे ठप्प होऊ लागली आहेत. त्यामुळे बांधकाम करणारे  घरमालक, कंत्राटदार व मजुरांचे अतोनात हाल सुरू आहेत.  

वाळू बंदीने अक्षरश: अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. रखडलेल्या बांधकामांचा परिणाम अनुषंगिक वस्तूंच्या बाजारपेठेवरही झाला आहे. विटा, रंगकाम, स्टीलची खरेदी मंदावली आहे. बांधकामास लागणार्‍या सर्वच साहित्यांच्या खरेदीची उलाढाल थांबली आहे. 

 दुसरीकडे बांधकामाच्या बहुतांश 

कामांत कृत्रिम वाळूचा वापर सुरू झाला आहे. शहरांतील पूल, फ्लायओव्हर्स, काँक्रिट रस्ते, मोठमोठे बिल्डिंग प्रोजेक्टस्, रेडिमिक्स प्लँट, प्रिस्ट्रेस्ड पाईप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूचा पर्यायी वापर सुरू झाला आहे. शिवाय या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता कमी न होता ती वाढते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण नैसर्गिक वाळू गोलाकार असते तर कृत्रिम वाळूचे कण साधारण त्रिकोणाकृती असतात. कोनिकल अँगलमुळे या बांधकामात घट्टपणा येतो. तो चुरा अधिक मजबुतीने चिकटला जातो, असे विज्ञान सांगते.

ब्लॅकचे दर 12 हजारांवर, स्थानिक वाळू 7 हजारांवरनदीतील वाळू उपशावर बंदी आहे. सर्व ठेके बंद आहेत. सांगली जिल्ह्यात शेकडो ट्रक पकडून ते तहसील कार्यालयाने जप्त केले आहेत. वाळू डेपोंवरही कारवाई केली आहे. परिणामी, काही ठिकाणी पावत्या असलेल्या बेगमपुरी वाळूचा प्रतिब्रास दर 12 हजारांवर गेला आहे. पावत्या नसल्या तरी 12 हजारांवर ब्रासचा दर पोहोचला आहे. स्थानिक ओढे व अग्रणी पात्रातील वाळूचा दर 5 ते 7 हजारांवर पोहोचला आहे. त्याचा परिणाम कृत्रिम वाळूवरही झाला आहे. त्या वाळूचाही दर 3300 वरून 4300 ते 4600 रुपये ब्रास झाला आहे. या सर्व वाढलेल्या दरामुळे व वाळूटंचाईमुळे  बांधकामे ठप्प झाली आहेत. घर बांधणारे हैराण झाले आहेत.