Sat, Apr 20, 2019 16:21होमपेज › Kolhapur › राधानगरी धरण भरले; दोन स्वयंचलित दरवाजे उघडले(video)

राधानगरी धरण भरले; दोन स्वयंचलित दरवाजे उघडले(video)

Published On: Jul 20 2018 4:26PM | Last Updated: Jul 20 2018 6:57PMराधानगरी : प्रतिनिधी 

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या आणि जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे सात पैकी दोन  स्वयंचलितदरवाजे शुक्रवारी दुपारी तीन वाजता  खुले झाले. या दरवाजातून २८५६ क्यूसेक्स तर वीज निर्मितीसाठी १६०० क्यूसेक्स असा एकूण ४४५६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असून  नदी काठच्या नगरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळी ओढ़ दिलेल्या पावसाने दुपारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. दुपारी तीन वाजता तीन आणि सहा क्रमांकाचे दरवाजे खुले झाले. गतवर्षी २६ ऑगस्टला धरणाचे दरवाजे खुले झाले होते. 

शुक्रवारी सकाळी ७३ मिमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर २९१३ मिमी पाउस झाला आहे. राधानगरी धरणात ८.३६ टी.एम.सी.पाणी साठा झाला आहे. धरणात ८३६२.१६ द. ल. घ. फु. इतका पाणीसाठा असून ३४७.५ फुट पाणी पातळी आहे. धरणातुन ४४५६ क्यूसेक्स विसर्ग सुरु असून तारळे व शिरगाव बंधा-यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने सुरु आहे. 

व्हिडिओ : नंदू गुरव, राधानगरी