होमपेज › Kolhapur › जिल्हा नियोजनाचा 132 कोटींचा आराखडा मंजूर

जिल्हा नियोजनाचा 132 कोटींचा आराखडा मंजूर

Published On: May 12 2018 1:28AM | Last Updated: May 11 2018 11:27PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा नियोजनचा 2018-19 चा वार्षिक कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेमध्ये 132 कोटी 49 लाखांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यांमध्ये जि.प.च्या 12 विभागांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. सभेमध्ये बांधकाम विभागास सर्वाधिक 30 कोटी 85 लाख निधी मंजूर करण्यात आला. तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागास 26 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेकडील संबंधित विभाग प्रमुखांनी जिल्हा नियोजनामधून कोणत्या बाबींसाठी किती निधीची तरतूद केली, याची माहिती 
दिली.
जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर झालेला निधीची माहिती सभागृहाला देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन मंडळाकडून जो निधी मंजूर झाला आहे, हा निधी 12 विभागांतील विकास योजनांवर खर्च करण्यात येणार आहे. 

 कृषी संलग्न सेवांतर्गत सौर विद्युत संच बसविण्यासाठी 1 कोटी निधी मंजूर झाला आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत जि.प.कडील पशुवैद्यकीय दवाखाने व प्रथमोपचार केंद्र बांधण्यासाठी 1 कोटी 25 लाख. याच दवाखान्यात औषधपुरठा करण्यासाठी 1 कोटी 10 लाख. दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्ध करण्यासाठी 10 लाख. कामधेनू दत्तक ग्राम योजनेसाठी 1 कोटी 17 लाखांची तरतूद केली आहे. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागांतर्गत प्रशासकीय बाबींसाठी 72 लाख तर ट्रायसेमसाठी 7 लाख निधी मंजूर आहे. पाणी व स्वच्छता विभागांतर्गत शौचालय बांधकामासाठी 25 कोटी 37 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत विभागांतर्गत यात्रास्थळ विकासासाठी 3 कोटी 60 लाख. मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी 6 कोटी 25 लाख व जनसुविधा पुरविण्यासाठी 6 कोटी 50 लाख मंजूर करण्यात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी सांगितले. 

प्राथमिक शाळा इमारतींचे बांधकाम 426 कोटी जि.प.ला अनुदान मिळाले आहे. त्यात दुरुस्तीसाठी 3 कोटी 50 लाख तर शासकीय माध्यमिक शाळा दुरुस्तीसाठी 30 लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 

समाजातील दुर्बल घटकांतील मुलींना उपस्थिती भत्त्यासाठी 4 लाख 50 हजार तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी 7 लाख 50 हजारांची तरतूद केली आहे. 
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी इमारत बांधकामासाठी 2 कोटी निधी मंजूर आहे. आरोग्य सेवेंतर्गत आयुर्वेद, युनानी दवाखाना सुविधेत वाढ करण्यासाठी 5 लाख, आयुर्वेद दवाखाना बांधकामासाठी 15 लाख, लघु पाटबंधारे विभागाकडील बंधारे बांधण्यासाठी 6 कोटी 24 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा मार्गाच्या मजबुतीकरणासाठी 22 कोटी 73 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारीकणासाठी 4 कोटी तरतूद केली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत पेयजय योजनांसाठी 26 कोटी 52 लाख मंजूर करण्यात आले आहेत.