Sun, Jul 21, 2019 09:55होमपेज › Kolhapur › वर्धापनदिनानिमित्त महापालिकेत आज ध्वजारोहण

वर्धापनदिनानिमित्त महापालिकेत आज ध्वजारोहण

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:14AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी नऊला कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात ध्वजारोहण होणार आहे. महापौर हसिना फरास यांनी राजीनामा दिला असल्याने आणि आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने स्थायी समिती सभापती संदीप नेजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यावेळी शहरातील वीर जवानांच्या वीरमाता, वीर पिता व वीर पत्नींचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, वर्धापनानिमित्त महापालिकेच्या मुख्य इमारतीला गुरुवारी रात्री आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.  

तावडे हॉटेल परिसरात सर्व्हे

कोल्हापूर ते गांधीनगर रस्त्यावरील तावडे हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. त्यावरून नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. परिणामी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व इतर अधिकार्‍यांनी तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणाबाबत जाग्यावर जाऊन गुरुवारी सर्व्हे केला. पुढील आठवड्यात या ठिकाणच्या अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात येणार असल्याचे सरनोबत यांनी सांगितले.