होमपेज › Kolhapur › महापौर कार्यालयात आपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

महापौर कार्यालयात आपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

By | Publish Date: Jul 21 2017 3:01PM

कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिका हदृीतून जाणारे रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्यासाठीचा ठराव करू नये यासाठी निवेदन देण्यास गेलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकत्यांना माजी नगरसेवक अदिल फरास यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप आपचे कार्यकर्ते  संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत संबंधीतांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी देसाई म्हणाले,  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार महामार्गापासून  पाचशे मीटरच्या अंतरावर असणारी  दारू दुकाने बंद करण्यात आली आहेत. यातून मार्ग काढून या मार्गाचे हस्तांतरण करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. त्यामुळे हा ठराव  मंजूर करू नये यासाठीचे निवेदन देण्यास महापालिकेत कार्यकर्ते गेले हेाते. यावेळी ताराराणी आघाडी, भाजपच्या नगरसेवकांशी चर्चा केली. त्यांनी महापौरांशीही चर्चा करा असे सांगितले.त्यांच्या सूचनेनुसार कार्यालयात बसलेलो असताना आदील फरास तेथे आले. त्यांनी महापौर येणार नाही, निवेदन माझ्याकडे द्या असे सांगितले. कार्यकर्त्यांनी महापौरांशीच चर्चा करणार तूम्हाला निवेदन कशासाठी द्यायचे असे बोलल्यावर आदिल फरास यांच्याशी कार्यकर्त्यांची शाब्दीक बाचाबाची झाली. त्यांनी थेट आपल्या समर्थकांना बोलवून घेतले. या समर्थकांनी माजी गळपट्टी धरत शाब्दीक बाचाबाची केली तर उत्तम पाटील याला मारहाण केली.