Thu, Jun 27, 2019 01:34होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः शरद पवारांच्या भेटीला भाजपचे नगरसेवक

कोल्हापूरः शरद पवारांच्या भेटीला भाजपचे नगरसेवक

Published On: Feb 11 2018 6:09PM | Last Updated: Feb 11 2018 6:12PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील भाजपचे गटनेते, ताराराणी आघाडीचे गटनेते यांच्यासह भाजपचे नगरसेवक रविवारी (दि.11) राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खा. शरद पवार यांना भेटायला उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आले आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार असले धनंजय महाडिक यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपशी सलगी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असताना पक्ष विरोधी कारवाया करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांनी उघड विरोध दर्शविला होता. लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत. 

गेली दोन दिवस शरद पवार हे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक स्मृति पुरस्कार सोहळा व अन्य कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रा. मंडलिक यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्रित करीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

रविवारी सकाळी खा.पवार हे मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये थांबले होते. खा. महाडिक साडेआठच्या सुमारास त्यांना भेटायला आले. त्यावेळी पवार यांनी आपल्या घरी चहापानास जायचं असे सांगताच महापालिकेतील भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे यांच्यासह भाजपचा मित्रपक्ष असलेला ताराराणी आघाडीचे गटनेते नगरसेवक सत्यजित कदम, विरोधी पक्ष नेते किरण शिराळे, राजसिंह शेळके व शेखर कुसाळे तेथे हजर असल्याचे दिसून आले. 

शरद पवार हे गोलिवडेला जाण्यापूर्वी खासदार महाडिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी चहापानास रविवारी सकाळी जाणार होते. प्रत्यक्षात खा. महाडिक यांच्या रूईकर कॉलनी येथील घरी होणारे चहापान झालेच नाही. भेटीनंतर खा. महाडिक हे पवार यांच्या गाडीत बसून गोलिवडे (ता.पन्हाळा) गावास भेट देण्यास निघून गेले.