Sun, May 26, 2019 13:15होमपेज › Kolhapur › मुंबईत राजर्षी शाहूंच्या नावे 'कोल्‍हापूर भवन'

मुंबईत राजर्षी शाहूंच्या नावे 'कोल्‍हापूर भवन'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

दिल्‍लीत प्रत्येक राज्याचे भवन आहे. त्याप्रमाणेच मुंबईतही प्रत्येक जिल्‍ह्याचे भवन उभारण्यात येणार आहे. त्याची सुरुवात कोल्‍हापूरपासून होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कोल्‍हापूर भवन निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

वारणा उद्योग समूहाच्या वतीने आयोजित ‘मुक्‍त संवाद, मुख्यमंत्री दिलखुलास’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री विनय कोरे यांची प्रमुख उपस्‍थिती होती. थेट जनतेतून विचारलेले प्रश्‍न आणि त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली उत्तरे असा हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.

राज्य सरकार लवकरात लवकर सर्व जिल्‍ह्यांना जागा उपलब्‍ध करून देणार आहे. त्यानंतर सुरुवातीला कोल्‍हापूर भवन उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना स्‍वस्‍तात वीज देणार असून गावठाण वाढीसाठीही प्रयत्‍न केले जाणार असल्याचे सांगितले.