Mon, Sep 24, 2018 03:48होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश

जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश

Published On: Jan 03 2018 1:19AM | Last Updated: Jan 03 2018 1:19AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (3) अन्वये बुधवारी (दि.3) सकाळी सात वाजल्यापासून बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बंदी आदेशान्वये पाच किंवा पाचहून अधिक लोकांनी एकत्र होणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे आदींसह शांततेस अगर सुव्यवस्थेस बाधा येईल अशा  प्रकारांना मनाई करण्यात आली आहे. बंदी आदेश 16 जानेवारी 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत असणार असल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी प्रसिध्दीस दिली आहे.