Mon, Aug 19, 2019 00:42होमपेज › Kolhapur › शिवज्‍योत आणण्यासाठी जाताना मोटारसायकल अपघातात एक ठार

शिवज्‍योत आणण्यासाठी जाताना मोटारसायकल अपघातात एक ठार

Published On: Feb 19 2018 8:41PM | Last Updated: Feb 19 2018 8:41PMबांबवडे : वार्ताहर 

शिराळ्‍यातीन दोन युवक शिवजयंती उत्‍सवानिमित्‍त ज्‍योत आनण्यासाठी पन्हाळा गडाकडे जात होते. या दरम्‍यान वारणा नदीच्या पूलानजिक काखे- मोहरे  रस्त्याच्या कॅनॉलवर दुचाकीची सरक्ष्रक कठड्याला जोरदार धडक बसली. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्‍यू झाला तर एक युवक जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री १० वा च्या सुमारास घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील घागरेवाडी येथील शिवशक्ती मंडळाचे दोन कार्यकर्ते शिवजयंती उत्सवानिमित्त ज्योत आनण्यासाठी  मोटरसायकलने पन्हाळा गडाकडे जात होते. यावेळी वारणा नदीच्या पूलानजिक काखे- मोहरे  रस्त्याच्या कॅनॉलवर दुचाकीची सरक्ष्रक कठड्याला जोराची धडक बसली. या धडकेत इंजिनिअर सुरज मोहन खोचरे ( वय -२ ४) हा जागीच ठार झाला तर सुरज सुर्यवंशी ( वय १९ ) किरकोळ जखमी झाला आहे. रविवारी रात्री १० च्या दरम्यान ही घटना घडली. कोडोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे

मोटारसायकलची धडक इतकी जोरात होती की, या अपघातात मोटरसायकलवर  पाठीमागे शिटवर बसलेला सुरज सुर्यवंशी हा गाडीच्या धडकेने उंच २० फूट उडून कॅनॉलच्या पाण्यात पडला .सुदैवाने पोहता येत असेलने पाण्यातून बाहेर येऊन आरडा, ओरडा,केल्याने पन्हाळा गडाकडे जाणाऱ्या शिरसी, आंबेवाडी,शिवभक्त मंडळाच्या कार्यकर्त्यानी व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेला प्रकार पाहताच सुरज खोचरे व सुरज सुर्यवंशी या दोघांना शासकीय रुग्णालय कोडोली ( ता. पन्हाळा ) येथे उपचारासाठी दाखल केले. असता सुरज खोचरे च्या डोक्याला गंभीर दुखापत व रक्तस्‍त्राव  झाल्याने डॉक्टरांनी  त्‍याला मृत घोषित केले  

मृत सुरज खोचरे हा आई - वडीलांना एकुलता एक मुलगा होता. इंजिनिअर म्हणून मुंबई येथे खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. तो दोन दिवसांची रजा काढून शिवजयंती साजरी करणेसाठी गावी आला होता. रविवारी सायंकाळी ८ च्या दरम्यान मंडळाचे १८ कार्यकर्ते  मोटरसायकलवरून पुढे गेले होते व पाठीमागून सुरज व त्याचा मित्र हे दोघे जात असताना अपघात झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे . तरुण इंजिनिअरच्या या दुदैवी अपघाताने पणुंब्रे घागरेवाडीवर शोककळा पसरली. सोमवारी सकाळी सुरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले.