होमपेज › Kolhapur ›  'त्‍या' सहाय्यक फौजदाराची तडकाफडकी बदली

 'त्‍या' सहाय्यक फौजदाराची तडकाफडकी बदली

Published On: Feb 09 2018 5:33PM | Last Updated: Feb 09 2018 5:33PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

शिरोळ पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार महेश रमेश शिंदे यांची काल पोलीस अधीक्षक संजय मोहीते यांनी तडकाफडकी पोलिस मुख्यालयात बदली केली. सहायक फौजदार महेश शिंदे यांची कारकीर्द वादग्रस्त असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या आत्महत्या प्रकरणात त्यांचा सहभा असल्याचे बोलले जात आहे. सध्या महेश शिंदे यांच्यावर शिरोळ पोलिस ठाण्यात जमा असलेल्‍या हत्यारांची आफरातफर केल्याचा आरोप आहे. 

महेश शिंदे यांचा सख्खा भाऊ विष्णु शिंदे हा देखील काही दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे सध्या पोलीस दलातुन बडतर्फ आहे. शिंदे बांधवांनी पोलीस दलात काम करत असताना जमवलेल्या मालमत्तेबाबत ही पोलिस दलात चर्चा सुरू आहे.