Sat, Jun 06, 2020 20:02होमपेज › Kolhapur › ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात युवती ठार; एकजण जखमी

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात युवती ठार; एकजण जखमी

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 14 2018 12:10AMशिये :  वार्ताहर 

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या सेवा रस्त्यावर शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर झालेल्या ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघात युवती जागीच ठार झाली तर तरुण जखमी झाला आहे. 

सारिका वसंत कांबळे (वय 33, रा. पोलिस मुख्यालय कोल्हापूर) असे मृत तरुणीचे नाव असून अक्षय शशिकांत बुचडे (वय 21, रा. दगडी चाळ शेजारी गोळीबार मैदान, क.  बावडा) हा जखमी झाला आहे.
शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आज दुपारी शिरोली गावाकडे जाणार्‍या अज्ञात ट्रॅक्टरने समोरून येणार्‍या मोटारसायकल (एम एच 09 ई क्यू 7022) ला समोरासमोर धडक दिल्याने मोटारसायकलवरील सारिका कांबळे जागीच ठार झाली तर त्यांच्या सोबत असणारा अक्षय बुचडे हा जखमी झाला. अपघात होताच घटनास्थळावरून ट्रॅक्टर भरधाव निघून गेल्याने ट्रॅक्टर व चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. मृत सारिका नर्स कामानिमित्त शिरोली येथे गेली असताना तिचा अपघाती मृत्यू झाला. तर जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

सारिका कांबळे हि निवृत्त पोलिस वसंत कांबळे यांची मुलगी असून त्यांना आणखीन दोन मुली आहेत. त्या पोलिस खात्यात सेवा बजावत आहेत. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली असून, या अपघाताचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगताप करीत आहेत.