Fri, Jul 19, 2019 01:38होमपेज › Kolhapur › मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरूच

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरूच

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मोरेवाडी येथील आठ वर्षाचा चिमुकला मावळा वीर सोमनाथ मगर याने दसरा चौकात तब्बल आठ तास स्ट्रेचिंग करण्याचा अनोखा विक्रम केला. 23 व्या दिवशीही मराठा आरक्षणासाठीचे ठिय्या आंदोलन सुरूच आहे.

ऐतिहासिक दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याबाबत वीर आईबरोबर विचारणा करीत होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी 10.30 वाजता वीर मगर हा ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी स्ट्रेचिंगला बसला. न उठता केवळ फळे खाऊन त्याने सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आठ तास स्ट्रेचिंग केले. आई शारदा मगर, आत्या रूपाली जाधव यांनी त्याचे प्रोत्साहन देऊन मनोधैर्य वाढविले. 

दुपारी दोनच्या सुमारास आ. राजेश क्षीरसागर यांनी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्याला प्रोत्साहन दिले. सायंकाळी साडेपाच वाजता स्ट्रेचिंग संपल्यानंतर सकल मराठाच्या वतीने त्याचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. आठ तास स्ट्रेचिंग केल्यानंतर तो रात्री उशिरा शिमोगा (कर्नाटक) येथे होणार्‍या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय प्युपिल्स ऑलिम्पिक गेम्ससाठी रवाना झाला.

गुरुवारी (दि.16) रावजी पाटील सहकारी दूध व्यावसायिक संस्था, श्रीपत वि.का.स.(वि.) सेवा संस्था मर्यादित खुुपिरे, श्रीपत नागरी सहकाी पतसंस्था मर्यादित, खुपिरे (ता.करवीर), कांचनवाडी गावच्या सर्व वि.का.स.सेवा संस्था, पाणीपुरवठा, दूधसंस्था, तरुण मंडळे व मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सिंधूताई शिंदे, शिरोळ तालुका अध्यक्ष शकुंतला कांबळे, अशोक कांबळे, मु.पो.माळुंगे येथील राष्ट्रीय अपंग विकास संघाच्या पदाधिकार्‍यांनी मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा 

दिला. जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, तालमी संस्था, तरूण मंडळे, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, विविध जाती-धर्मीयांचा ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ओघ कायम आहे.