Mon, Jun 17, 2019 04:12होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस जखमी

कोल्हापूर : जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस जखमी

Published On: Jan 03 2018 1:56PM | Last Updated: Jan 03 2018 1:56PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

भीमा कोरेगावप्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापुरात दसरा चौक, बिंदु चौक या ठिकाणी भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेध करण्यात आला. तसेच कोंडा ओळ लक्ष्मीपुरी येथे जमाव समोरा समोर आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याने एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. योगेश वावरे असे जखमी पोलिसाचे नाव आहे.

राज्यात अनेक शहरांमध्ये कडक बंद पाळण्यात आला आहे. काही शहरांमध्ये तणावाचे वातावरण आहे. संवेदनशिल ्रअसलेल्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.