Sun, Aug 25, 2019 03:38होमपेज › Kolhapur › महापालिकेची घरफाळ्यात सवलत

महापालिकेची घरफाळ्यात सवलत

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेतर्फे घरफाळ्यामध्ये विविध कारणांसाठी सवलत दिलेली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांनी केले आहे. 
संपूर्ण रक्कम जमा केल्यास घरफाळा  रकमेवर जून 2018 अखेर सहा टक्के सूट मिळणार आहे.  रेन हार्वेस्टिंग सिस्टीम, कृमी मिश्र खत किवा बायोगॅस किवा कंपोस्टिंग प्रक्रिया 100 टक्के केल्याससौरऊर्जेचा वापर व इतर पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापर,  सांडपाण्याचे पुनश्‍चकरण आणि पुनर्वापर केल्याची व्यवस्था, पर्यावरण पूरक आणि परिस्थितीकीय लाभदायक गृहनिर्माण यांना चालना देणे, अशा योजनाची अंमलबजावणी केलेली असल्यास सर्वसाधारण करामघ्ये प्रत्येक योजनेसाठी एक टक्का अतिरिक्त सूट मिळणार आहे. 

यासाठी महानगरपालिका संबंधित विभाग प्रमुखाचे प्रमाणपत्रासह लेखी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. माजी सैनिक यांची विधवा पत्नी किवा शौर्यपदक विजेता संरक्षण दलातील सैनिक यांच्या एका मिळकतीसाठी मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम माफ करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सैनिक अधिकारी, यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत दाखल करावयाचे आहे. पाच लाखांपेक्षा अधिक वार्षिक कराची रक्कम असलेल्या मिळकतधारकांना कराच्या बिलाबरोबरच विनंतीपत्र देण्यात येऊन  सहा टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.  जुन्या बिलाची प्रत किवा माहीत असलेस करदाता क्रमांक सांगून मालमत्ता (घरफाळा) कराची रक्कम नागरी सुविधा केंद्रात जमा करता येईल, यासाठी कराचे बिल सोबत आणणे आवश्यक नाही.  कराची रक्कम जमा करून भविष्यात होणार्‍या दंडाच्या रकमेपासून सुटका मिळवावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर निर्धारक दिवाकर कारंडे यांनी केले आहे.