Mon, Nov 19, 2018 12:46



होमपेज › Kolhapur › कलानगरीतील विविध टॅलेंटस्ना संधी

कलानगरीतील विविध टॅलेंटस्ना संधी

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 12:11AM



कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

लोकराजा राजर्षी शाहूंचा राजाश्रय आणि कलाप्रेमींच्या भक्‍कम पाठबळ व प्रोत्साहनामुळे कोल्हापूरची सर्वत्र ‘कलापूर’ अशी ओळख निर्माण झाली आहे. पारंपरिक लोककला, विविध व्यवसायांवर आधारित कला, सांस्कृतिक वारसा जपणार्‍या कला यांनी ही कलानगरी परिपूर्ण बनली आहे. कलानगरीतील अशा कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी ‘कोल्हापूर रन’च्या माध्यमातून मिळणार आहे. खेळाबरोबरच करमणूकीच्या कार्यक्रमांची विविधता कोल्हापूर रनचे वैशिष्ट्य असणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जमणार्‍या हजारो क्रीडाप्रेमींच्या करमणुकीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रग्गेडियन क्‍लबतर्फे करण्यात आले आहे.  

क्रीडानगरी कोल्हापुरात 11 फेब्रुवारी रोजी होणार्‍या ‘हिट 24 ग्रुप प्रेझेंटस् डीवायपी रग्गेडियन कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन 2018’ स्पर्धा अवघ्या आठ दिवसांवर आली आहे. मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील हजारो स्पर्धकांनी आपला सहभाग निश्‍चित केला आहे. अनेकजण सहकुटुंब-मित्रपरिवारासह मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. दैनिक ‘पुढारी’ मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर असून, टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर आहेत. हिट 24 ग्रुप प्रेझेटिंग पार्टनर तर डीवायपी गु्रप टायटल स्पॉन्सरर आहेत. कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्युन शहा गु्रप व एस.जी.यू. सिल्व्हर स्पॉन्सर,  जे. के. गु्रप व्हेंचर, कोरगावकर पेट्रोल पंप फ्युअल पार्टनर, कोंडुसकर ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल पार्टनर, हॉटेल थ्री लिव्ह हॉस्पिटॅलिटी पार्टनर, आणि हॉट फ्रायडे टॉक्स लाईफस्टाईल पार्टनर, इन्स्टिंक्ट मीडिया डिजिटल पार्टनर आणि कोल्हापूर मनपाच्या सहकार्याने ही मॅरेथॉन होत आहे.  

मॅरेथॉन सहभागासाठी  या संकेत स्थळावरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी रग्गेडियन स्टोअर्स, डीवायपी मॉल तिसरा मजला, डी. टी. कारेकर सराफ (घाटी दरवाजा) अंबाबाई मंदिरसमोर, रग्गेडियन ऑफिस अमात्य टॉवर चौथा मजला, दाभोळकर कॉर्नर किंवा रग्गेडियन स्टोअर्स डीवायपी मॉल तिसरा मजला कोल्हापूर आदी ठिकाणी सुरू असून याठिकाणी किंवा 9623688881, 8806226600/ 9623688886 या क्रमांकांवर संपर्क साधावा. 


मॅरेथॉनच्या मार्गावर सांस्कृतिक कार्यक्रम...

मॅरेथॉन 50 कि.मी., 42 कि.मी., 21 कि.मी., 10 कि.मी. आणि 5 कि.मी. अशा विविध अंतराची असणार आहे. मॅरेथॉनचा स्टार्टिंग पॉईंट सेंट झेवियर्स हायस्कूल आहे. तेथून सुरू होणारी मॅरेथॉन पोलिस मैदान चौक -धैर्यप्रसाद हॉल चौक -सर्किट हाऊस - लाईन बझारपासून पुन्हा फिरून सर्किट हाऊस - धैर्यप्रसाद चौक - ताराराणी चौक (कावळा नाका)- डीवायपी सीटी मॉल- उड्डाणपूलमार्गे- शिवाजी विद्यापीठ- शाहू नाकामार्गे पुन्हा परतीच्या मार्गावरून सेंट झेवियर्स (स्टार्टिंग पॉईंट) या मार्गावरून धावणार आहे. या मार्गावर ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत पाहायला मिळणार आहे. यात लाईव्ह डी.जे., झांजपथक, भरतनाट्यम, शिवकालीन युद्धकला (मर्दानी खेळ), ढोलपथक, झुंबा, आतषबाजी यांचा समावेश असणार आहे. ज्यांना आपली कला सादर करायची आहे, त्यांनी 9623688883 या क्रमांकावर संपर्क साधावा.