Thu, Apr 25, 2019 07:45होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण लढा परिषद सप्टेंबरमध्ये

मराठा आरक्षण लढा परिषद सप्टेंबरमध्ये

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील मराठा आमदार-खासदार मंत्री यांच्यासह मराठा समाजाचे कार्य करणार्‍या विविध संघटना, मंडळे सकल मराठा समन्वयक प्रतिनिधी यांची संयुक्त परिषद आरक्षणाची जनक शाहूनगरी कोल्हापुरात सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्याचा निर्णय मराठा संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. 

शिवाजी पार्क येथील उद्यानात ही बैठक झाली.देश स्वातंत्र्यापासून 70 वर्षे झाली तरीही मराठा समाजातील गोरगरीब गुलामीतच जगत आहे. मराठा आरक्षणाअभावी शिक्षण व नोकरीत योग्यता असूनही संधी मिळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कोल्हापुरात सकल मराठा संघटनेच्या वतीने गेली 20 दिवसांपासून ऐतिहासिक दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. याशिवाय विविध संस्था-संघटना, तालीम-संस्था, पेठापेठांत अखंड आंदोलन सुरूच आहे. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्‍नाबाबत चर्चा करण्यासाठी समाजातील आजी-माजी खासदार, आमदार, मंत्री व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने ही परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळ घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रणजित भोसले, दिनकर सरनोबत, धिरज सावंत, माधवराव जाधव, सुरेश देसाई, नितीन शेळके, तानाजीराव धनवडे, राजेंद्र इंगळे, धनाजीराव मोरे यांच्यासह कोल्हापूर-सांगली-सातारा-सिंधुदुर्ग-नगर-पुणे येथील प्रतिनिधी उपस्थित होते.