Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Kolhapur › भरपावसात लिंगायत समाजाचे धरणे

भरपावसात लिंगायत समाजाचे धरणे

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यतेसाठी समितीने केलेली शिफारस केंद्र शासनाकडे पाठविणेे, लिंगायत समाजाला राज्य पातळीवरील अल्पसंख्याक दर्जा देणे यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर लिंगायत समाज संस्था (कोल्हापूर) आणि लिंगायत समाज संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवारपासून बेमुदत निर्धार धरणे आंदोलन पुकारले. पहिल्याच दिवशी भरपावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारपासून लिंगायत समाजाने बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली. पोलिसांनी मांडवाला परवानगी नाकारल्याने भरपावसाताच या आंदोलनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, वीरेंद्र मंडलिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांच्यासह परिवर्तनवादी पक्ष, रिपब्लिक पक्ष यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला. आणूर (ता. कागल) ग्रामसभेत लिंगायत समाजास अल्पसंख्याक म्हणून आरक्षण मिळावे, मागणीचा ठराव करून तो ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी आणून दिला. समाजातील शिरोळ तालुक्याचे मिलिंद साखरपे, हातकणंगलेचे नीळकंठ मुघोळखोड, कागलचे संजय चितारी, गडहिंग्लजचे महेश आरभावी, करवीरचे महेश पाटील यांनी आंदोलनाला भेट देऊन मनोगत व्यक्त केले.

यावेळी बाबुराव तारळी, विनोद नायकवडी, राजशेखर तंबाके, राजशेखर गड्डी, सरलाताई पाटील, भीमगोंडा पाटील, मिलिंद साखरपे, अशोक माळी, नीळकंठ मुगुळखोड, शिवानंद माळी, संजय चितारी, मोहन घीनची, गजानन सुलतानपुरे, महेश चौगले, महेश आरभावी, प्रसाद खोबरे, डॉ. डांग आजरा, बापू चौगले, अनिल सोलापुरे, सुधीर पांगे, सुनील गाताडे, सुधीर शहापुरे, सुहास भेंडे, चंद्रशेखर तारळी उपस्थित होते.