Mon, Jan 21, 2019 21:18होमपेज › Kolhapur › राज्यात सहा कौशल्य विकास विद्यापीठ साकारणार 

राज्यात सहा कौशल्य विकास विद्यापीठ साकारणार 

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 11:46PMउजळाईवाडी  : प्रतिनिधी

समृद्ध देश हा खरा ग्रामीण भागात आहे. त्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. याकरिता केंद्रशासनाच्या मदतीने राज्यात सहा कौशल्य विकास विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात चंद्रपूर येथून होणार असून, सिद्धगिरी कारागिरी ज्ञानपीठास  सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील -निलंगेकर यांनी दिली.
कणेरी (ता. करवीर) येथील कारागिरी महाकुंभच्या दुसर्‍या  दिवसातील सत्रात मंत्री पाटील-निलंगेकर बोलत होेते.

अध्यक्षस्थानी हृदयनाथसिंहजी होते. प्रास्ताविकात अद‍ृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी मठावरील विविध उपक्रमांची माहिती दिली, तर डॉ. मनोजकुमार यांनी गांधी यांच्या स्वप्नातील खेडी निर्माण करण्यासाठी स्वयंपूर्ण खेडी आणि अर्थव्यवस्था बळकट होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय कारागीर पंचायतचे नरेंद्रनाथ मल्होत्रा यांनी ग्रामीण कारागीर सक्षम झाल्यास भारत देश आर्थिक महासत्ता बनेल, असे  सांगितले. यावेळी प्रा. बी. जे. मांगलेकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमास अण्णा डांगे, यांच्यासह मान्यवर उपस्थित  होते.