Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Kolhapur › गांधीनगरात अवैध माती उत्खनन?

गांधीनगरात अवैध माती उत्खनन?

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 1:11AMकोल्हापूर: प्रतिनिधी

गांधीनगर परिसरात पंचगंगा नदीकाठी मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू आहे. त्याची गांधीनगर परिसरात राजरोस वाहतूकही सुरू आहे. या मातीचे उत्खनन आणि वाहतूक अवैध पद्धतीने होत असल्याचा संशय आहे. वीट भट्टीसाठी ही माती वापरण्यात येत असल्याचीही चर्चा आहे.

गांधीनगर परिसरात नदीकाठी शुक्रवारी सकाळपासून मातीचे उत्खनन सुरू होते. उत्खनन केलेल्या मातीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर-ट्रॉल्याही आणण्यात आल्या होत्या. माती भरल्यानंतर भन्नाट वेगाने गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरून ट्रॅक्टर-ट्रॉल्या धावत होत्या. एकापाठोपाठ एक मातीची वाहतूक करणार्‍या या ट्रॅक्टर-ट्रॉल्या पाहून नागरिकांत त्याची चर्चा सुरू होती.

गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. पावसाळाही तोंडावर आला आहे. त्यातच तलाठी, मंडल अधिकारी ऑनलाईन सातबार्‍याच्या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातच आहेत. त्याचा फायदा घेत, मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले जात आहे. उत्खनन केलेली माती वाहतूक करण्यासाठी क्रमांक नसलेल्या ट्रॉल्यांचाही वापर होत असल्याने हा सर्व प्रकार अवैध पद्धतीनेच सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेे.अवैध उत्खनन, वाहतूक केल्यास मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्याची अमंलबजावणीच होत नसल्याचे चित्र गांधीनगर परिसरात दिसत आहे.