Tue, Mar 19, 2019 09:39होमपेज › Kolhapur › कोल्हापूर: कुरूंदवाड-नांदणी मार्गावर अपघात; 1 ठार, 30 जखमी

कोल्हापूर: कुरूंदवाड-नांदणी मार्गावर अपघात; 1 ठार, 30 जखमी

Published On: Jul 12 2018 10:53AM | Last Updated: Jul 12 2018 11:40AMजयसिंगपूर: पुढारी ऑनलाईन/प्रतिनिधी

कुरूंदवाड-नांदणी मार्गावर भैरवाडीजवळ गणेश बेकरीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी खासगी बस वळणावर घसरून पलटी झाल्याने एकजण ठार तर २० ते ३० कर्मचारी जखमी झाले. काशीनाथ बेरड (रा.दानवाड ता.शिरोळ) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.

सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कुरुंदवाड मार्गे नांदणीला गणेश बेकरीकडे कर्मचारी येत होते. भैरेवाडीच्या पुढे वळणावर संजय बाबुराव टपाले यांच्या शेताजवळ (गट नं.६६३) बस आली असता अरुंद रस्त्यावर चालकाचा ताबा सुटून बस शेतात जाऊन पलटी झाली. काशीनाथ बेरड हा बसच्या दरवाजा जवळ उभा असल्याने बस पलटी होत असल्याचा अंदाज लागल्याने त्यांनी बसमधून उडी मारली. पण बसच बेरड अंगावर पलटी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड,जुने दानवाड, अकिवाट, सैनिक टाकळी, टाकळीवाडी या गावातील कामगार नांदणी ता.शिरोळ येथील कामाला आहेत. या कामगारांना सकाळच्या सत्रात बस नसल्याने सुरेश अण्णा शेंडूरे (रा.नांदणी) यांच्या मालकीच्या बसने(क्र.एम.एच 09, सी व्ही.0718)ते नेहमी ये जा प्रवास करत असतात. रवींद्र बाबासाहेब चव्हाण (रा.नांदणी) असे चालकाचे नाव आहे. अपघातावेळी बसमध्ये चाळीस ते पन्नास असे महिला व पुरुष कामगार होते. जखमी कामगारांवर नांदणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.