Sun, Apr 21, 2019 13:50होमपेज › Kolhapur › रस्ते विकासाचा ३५५ कोटींचा आराखडा

रस्ते विकासाचा ३५५ कोटींचा आराखडा

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 03 2018 12:13AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

2017-18 या वर्षासाठी 355 कोटी 79 लाख रुपयांचा रस्ते विकासाचा आराखडा तयार केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांनी दिली. कोल्हापूर रिंगरोडच्या कामाला या महिन्यात प्रारंभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

साळुंखे म्हणाले, 355 कोटी 79 लाख रुपयांच्या निधीतून 81 रस्त्यांची आणि 16 पुलांची कामे केली जातील. यासह 225 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. सोनवडे-शिवडाव घाटासाठी 70 कोटी रुपये मंजूर आहेत. यासह कोल्हापूर-शेळेवाडी, परिते-गैबी, केर्ली-कोतोली आदी कामे प्रगतिपथावर आहेत. कोल्हापूर शहरालगतच्या 23 गावांतून जाणार्‍या 88.52 कि.मी.च्या रिंगरोडसाठी 425 कोटींचा प्रस्ताव आहे. या वर्षासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तीन वर्षांत 39 पुलांची कामे करण्यात येत असून, त्यापैकी 15 कामे पूर्ण झाली आहेत.