Thu, Nov 15, 2018 07:22



होमपेज › Kolhapur ›  कोल्‍हापूर : कोल्‍हापूर शहर विकासावरुन विधानभवनाच्‍या पायर्‍यावर निदर्शने

कोल्‍हापूर शहर विकासावरुन विधानभवनाच्‍या पायर्‍यावर निदर्शने

Published On: Jul 20 2018 2:12PM | Last Updated: Jul 20 2018 2:12PM



कोल्‍हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ ऐवजी कोल्हापूर शहर विकास प्राधिकरणाची घोषणा करुन एक वर्ष उलटून गेले  आहे. तरीही आज  अखेर कोणत्याही प्रकारे शहराच्या विकासाची सुरूवात झालेली नाही.  यासंबधी विधानभवनाच्‍या पायर्‍यावर जोरदार निदर्शने करण्‍यात आली. 

कोल्‍हापूर शहर प्राधिकरणाव्दारे शहर विकासाची सुरुवात करण्‍यासाठी व शासनास जाग आणून देण्‍यासाठी आज नागपूर येथे विधानभवनाच्या पायऱ्या वर जोरदार निदर्शने करण्‍यात आली.  यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,  भरतशेठ गोगावले,  बालाजी किणीकर,  प्रकाश सुर्वे  आदि उपस्‍थित होते.