Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : पत्‍नीला धमकी देऊन मेहुण्यावर चाकूहल्‍ला

कोल्‍हापूर : पत्‍नीला धमकी देऊन मेहुण्यावर चाकूहल्‍ला

Published On: Feb 23 2018 7:56PM | Last Updated: Feb 23 2018 7:56PMकुरूंदवाड : प्रतिनिधी

तू घरी चल, तुला जिवंत सोडणार नाही अशी पत्नीला धमकी देत मेहुण्यावर चाकूहल्‍ला केल्याची घटना कुरुंदवाड येथे घडली. या हल्‍ल्यात मेहुणा अकरम रसूल पट्टेकरी जखमी झाला आहे. तर याप्रकरणी साजिद महम्‍मद शेख याच्याविरोधात कुरुंदवाड पोलिसांत गुन्‍हा दाखल झाला आहे. 

साजिद याने घरगुती वादातून सासर्‍याच्या घरी येऊन सासर्‍याला शिवीगाळ केली. यावेळी त्याने पत्‍नीला घरी गेल्यावर ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मेहुणा अकरमवर चाकूहल्‍ला केला. या हल्‍ल्यात अकरम जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून अकरम यांनीच साजित शेख विरोधात कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दिली आहे.