होमपेज › Kolhapur › पी. एन. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

पी. एन. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:00AM

बुकमार्क करा
कौलव ः प्रतिनिधी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर  यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. कोल्हापुरात भारत हौसिंग सोसायटीच्या आवारात शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पाटील यांना फोनवरून शुभेच्छा देणार्‍यांमध्ये दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल, सरचिटणीस मोहनप्रकाश, दिग्विजय सिंग, विलास मुत्तेमवार, व्ही. जॉर्ज, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, खा. राजीव सातव, खा. उदयनराजे भोसले, खा. संभाजीराजे, शाहू महाराज, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. माणिकराव ठाकरे, आ. बाळासाहेब थोरात, आ. उल्हासदादा पवार, आ. पतंगराव कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मोहनराव कदम, महमद नसीम खान, आनंदराव पाटील, रमेश बागवे, आ. हसन मुश्रीफयांचा समावेश आहे.

महापौर सौ. स्वाती येवलुजे, उपमहापौर अर्जुन माने, दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, आ. अमल महाडिक, आ. प्रकाश आबीटकर, आ. सत्यजित पाटील, माजी आ. महादेवराव महाडिक, बजरंग देसाई, संजय घाटगे, भरमूअण्णा पाटील, दिनकरराव जाधव, आ. बाळासाहेब पाटील (कराड), काकासाहेब पाटील (निपाणी), नामदेवराव भोईटे, के. पी. पाटील, प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, सर्व संचालक, व्ही. बी. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरूळकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, तौफीक मुल्लाणी, शारंगधर देशमुख, शशिकांत खोत, भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, सर्व संचालक, राजेश लाटकर, भय्या माने, करवीरचे उपसभापती विजय भोसले, राधानगरीचे उपसभापती रविश पाटील-कौलवकर, अर्जुन आबीटकर, अभिजित तायशेटे, सुशील पाटील-कौलवकर, सुधाकर साळोखे यांच्यासह जिल्ह्याच्या राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, करवीर व राधानगरी मतदारसंघातील कार्यकर्ते यांनी पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-सडोलीकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील-सडोलीकर व ‘गोकुळ’चे संचालक उदय पाटील-सडोलीकर यांनी केले.