होमपेज › Kolhapur › कस्तुरी क्लबतर्फे मकर संक्रमण सोहळा

कस्तुरी क्लबतर्फे मकर संक्रमण सोहळा

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 12:34AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी  
दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. अनेक सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मकरसंक्रांत या सणाच्या निमित्ताने संक्रांत ते रथसप्तमी दरम्यान महिला एकमेकींना हळदी-कुंकू, तिळगूळ देतात. संक्रांत वाण म्हणून भेटवस्तू लुटतात. याचेच औचित्य साधून मंगळवार (दि. 23) रोजी कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी ‘मकर संक्रमण सोहळा’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कस्तुरी क्लबतर्फे आयोजित या सोहळ्याला मराठी चित्रपट ‘आपला माणूस’ यातील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व इरावती हर्षे उपस्थित राहणार आहेत. चला तर मग अनुभवण्यासाठी.... नाना पाटेकरांसोबत दिलखुलास गप्पा...
दि. 23 रोजी व्ही. टी. पाटील हॉल, राजारामपुरी येथे दु. 3.00 वा. हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक खातू मसाले हे असून सहप्रायोजक सुवर्ण स्पर्श ज्वेलर्स व भांबुरे क्रिएशन्स हे आहेत. 

यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ व गाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच खेळांमधील विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू (इरकली साड्या) तसेच उपस्थित सर्वांसाठी लकी ड्रॉमधून भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी लाभणार आहे.  कार्यक्रमाला उपस्थित राहणार्‍या सभासदांना कस्तुरी क्लबतर्फे  संक्रात वाण व खातू मसाले यांच्याकडून भेट देण्यात येणार आहे. (कस्तुरी क्लब ओळखपत्र आवश्यक)
अधिक माहितीसाठी संपर्क :  टोमॅटो एफ.एम. कार्यालय, वसंत प्लाझा, बागल चौक, कोल्हापूर. मोबा.  8805007724, 8805024242. ऑफिस- 0231-6625943.