Wed, Jul 24, 2019 02:04होमपेज › Kolhapur › सुप्स अन् स्टार्टर रेसिपी वर्कशॉप

सुप्स अन् स्टार्टर रेसिपी वर्कशॉप

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे महिला व मुलींसाठी नेहमीच विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. याही वेळेस कस्तुरी क्‍लबतर्फे सुप्स आणि स्टार्टर रेसिपी वर्कशॉपचे आयोजन केले आहे. 
आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा नेहमी काही ठराविक प्रकारचे सुप्स आणि स्टार्टर ऑर्डर करतो. या पलीकडचेही अनेक सुप्स आणि स्टार्टरचे प्रकार आपण ऐकलेले असतात; परंतु ते बनविलेले नसतात. म्हणूनच कस्तुरी क्‍लबने नेहमीपेक्षा जरा हटके पदार्थ शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

वर्कशॉप शनिवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता हॉटेल केट्री, शिवाजी पार्क, कोल्हापूर येथे होईल. हॉटेल केट्रीच्या नामवंत शेफकडून रेसिपी शिकण्याची संधी सभासदांना व इतरांनाही मिळणार आहे. या वर्कशॉपमधून लेमन कोरिएंडर सुप, बटन मशरूम सुप, थाई जिंजर कोकोनेट सुप तसेच स्टार्टर्समध्ये बेबीकॉर्न स्टीक्स, शांघाई पनीर, व्हेज फ्राईड वाँटन हे आणि अशा प्रकारचे अनेक पदार्थ शिकता येणार आहेत. 

हॉटेलप्रमाणेच घरच्या घरी हे पदार्थ कसे बनवायचे याचे प्रशिक्षण या वर्कशॉपमध्ये देण्यात येणार आहे. या वर्कशॉपसाठी नावनोंदणी आवश्यक आहे व प्रवेश मर्यादित आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क - टोमॅटो एफ.एम. कार्यालय, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर. फोन नं. 8805007724, 8805024242.