Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आयोजित झुम्बा वर्कशॉपचा उत्साहात समारोप

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आयोजित झुम्बा वर्कशॉपचा उत्साहात समारोप

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 10:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे आयोजित झुम्बा वर्कशॉपला महिला आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बुधवारी (दि. 25) उत्साहात या वर्कशॉपचा बिंदू चौक येथील दै. ‘पुढारी’ इमारतीमध्ये समारोप झाला. वर्कशॉपच्या माध्यमातून अ‍ॅरोबिक, स्ट्रेचिंग, बॉडी फिटनेस, झुम्बा स्टाईल्स, बॉडी टोनिंग, पॉवर स्ट्रेचिंग, बॉडी शेप आणि अ‍ॅडव्हान्स टेक्निक आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.  बुगीवुगी फिटनेस सेंंटरच्या प्रशिक्षक कांचन साधवाणी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने कस्तुरी सभासदांना प्रशिक्षण दिले. साधवाणी यांचे नागाळा पार्क आणि महालक्ष्मी मंदिरजवळ असे दोन फिटनेस सेंटर आहेत. 

आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि तारुण्य टिकवण्यसाठी झुम्बा सारख्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे सभासद महिलांनी मत व्यक्त केले. तसेच या माध्यमातून हा नवीन डान्स प्रकार शिकायला मिळाला म्हणून सभासदांनी कस्तुरी क्लबचे आभार मानत पुन्हा असे वर्कशॉपचे आयोजन करावे, अशी इच्छा व्यक्त केली.