Wed, Jan 16, 2019 13:29होमपेज › Kolhapur › कस्तुरी क्लब सभासदांनी अनुभवल्या  कलाकारांसमवेतच्या दिलखुलास गप्पा

कस्तुरी क्लब सभासदांनी अनुभवल्या  कलाकारांसमवेतच्या दिलखुलास गप्पा

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:10PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सिने कलाकरांच्या दिलखुलास गप्पा अन् सोबतीला हिंदी, मराठी चित्रपटातील बहारदार गीते व नृत्यांच्या तालावर थिरकत कस्तुरी क्लब सभासदांनी रविवारची सायंकाळ एंजॉय केली. सिने कलाकारांशी जसजशा गप्पा रंगत गेल्या तशा कस्तुरी क्लब सभासदांनी शिट्ट्या, टाळ्यांचा प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. 

दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने ‘रणांगण’ चित्रपटातील कलाकारांसमवेत रविवारी (दि.29) सायंकाळी दिलखुलास गप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री ट्रॅव्हल्स व बेस्ट ऑफ प्लेस हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. याप्रसंगी पद्मावती सारीज व दत्ताजीराव माने सराफ यांच्यावतीने कस्तुरी क्लब सभासद नोंदणीचा लकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी हिंदी, मराठी चित्रपटांतील अनुभवाबद्दल बोलताना कलेला भाषा नसल्याचे सांगितले. अभिनेते स्वप्निल जोशी म्हणाले, पौराणिक मालिकेतील श्रीकृष्ण ते खलनायकापर्यंतच्या प्रवासाने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माती करिश्मा जैन, अभिनेत्री प्रणाली घोगरे यांनी प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली. याप्रसंगी कस्तुरी क्लब सभासदांनी सिने कलाकारांबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. 

यावेळी शांतादेवी डी. पाटील, बेस्ट ऑफ प्लेसचे हर्षवर्धन भुरके, काविरा नॅचरल्सचे नयन यादव, दत्ताजीराव माने सराफ, प्रशांत उन्हाळकर आदी उपस्थित होते.