Tue, Mar 26, 2019 07:39होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या अनिशाला कल्पना चावला शिष्यवृत्ती

कोल्हापूरच्या अनिशाला कल्पना चावला शिष्यवृत्ती

Published On: Mar 20 2018 9:07PM | Last Updated: Mar 20 2018 9:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरची कन्या अनिशा राजमाने हिला प्रतिष्ठेची कल्पना चावला शिष्यवृत्ती मिळाली आहे. अवकाश संशोधनातील पदव्युत्तर शिक्षणासाठी फ्रान्समधील इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटच्या वतीने ही शिष्यवृत्ती देण्यात येते. जगभरातील हजारो शोध निबंधांमधून अनिशाची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात अवकाश संशोधन क्षेत्रातच काम करायचे असून, ते भारतासाठीच करायचे असल्याचे मत अनिशाने पुढारी ऑनलाईनला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. 

केआयटी कॉलेजमध्ये प्रॉडक्शन इंजिनीअरिंग केलेल्या अनिशाचे शालेय शिक्षण होलीक्रॉस शाळेत झाले आहे. या शिष्यवृत्ती संदर्भात सुरुवातीला विशेष माहिती नव्हती. मात्र, लीना बोकील यांच्या माध्यमातून त्यांना या शिष्यवृत्ती संदर्भात माहिती मिळाल्याचे अनिशाने सांगितले. प्रॉडक्शन इंजिनीअरिंगमधील शिक्षणाचा अवकाश संशोधनात कसा उपयोग करता येईल, या संदर्भात शोधनिबंध सादर करायचा होता. त्या शोधनिबंधातूनच तिची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. 

आई-वडील आणि मित्र-मैत्रिणींनी तिला या शिष्यवृत्तीसाठी खूप प्रोत्साहन दिल्याचे अनिशा सांगते. भारतात जन्मलो असल्यानं आपल्या भारतासाठीच अवकाश संशोधनात काम करण्याची इच्छा आहे, असे अनिशाने सांगितले. 

कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद काम करणाऱ्या अनिशाने पुढारी ऑनलाईनला विशेष मुलाखत दिली आहे. तिची मुलाखत पाहण्यासाठी https://goo.gl/YZL1Rr पुढारी ऑनलाईनच्या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या. अनिशाच्या व्हिडिओबरोबरच आणखी ताज्या घटना, घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी पुढारी ऑनलाईनच्या यू-ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

Tags : kalpana chawala scholarship, kolhapur, student, anisha rajemane, kolhapur news