Tue, Apr 23, 2019 13:50होमपेज › Kolhapur › कागल बसस्‍थानकाचे नियंत्रण कक्ष पेटवले, चोरीचा उद्देश

कागल बसस्‍थानकाचे नियंत्रण कक्ष पेटवले, चोरीचा उद्देश

Published On: Dec 23 2017 12:25PM | Last Updated: Dec 23 2017 12:09PM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

कागल बसस्थानकावरील नियंत्रण कक्ष पेटवून देण्यात आले आहे. दरवाजाचे कुलूप तुटले असल्याने चोरीचा उद्देश्य असल्याचा पोलिसाचा संशय आहे. बसस्थानक परिसरातील मोबाईल दूकानासह एटीएम फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. तसेच या परिसरातील चार ते पाच दुकानेदेखील फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.