Thu, Jul 18, 2019 06:06



होमपेज › Kolhapur › कागल तालुक्यातून 14 जण हद्दपार

कागल तालुक्यातून 14 जण हद्दपार

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 1:36AM



कागल : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस प्रमुख यांनी कागल शहर व परिसरातील 14 जणांना कागल तालुक्यातून हद्दपार केले असून कागल पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. यामध्ये कृष्णात आप्पासो कांबळे रा. लिगनूर दुमाला, सुहास गणपती जकाते रा. कागल, सुभाष विष्णू सणगर रा. सणगर गल्‍ली कागल, सचिन बाळासो माळी रा. कसबा सांगाव, किशोर महादेव हुच्चे रा. हनबर गल्‍ली कागल, नवनाथ नागेश पाटील, रा. संभाजी चौक कागल, दत्तात्रय तुकाराम कांदेकर रा. गोकुळ शिरगाव, आनंदा 

महादेव बुसड रा. शाहूनगर कागल, जावेद बादशहा जमादार रा. माळी गल्‍ली कागल, शामराव मल्‍लापा दावणे रा. यशवंत किल्‍ला कागल, सचिन धोंडिराम गिरी रा. गहिनीनाथ नगर कागल, विनोद राजेंद्र पिष्टे रा. हनबर गल्‍ली कागल, सुनील बजरंग सणगर रा. सणगर गल्‍ली, दशरथ नामदेव खोत रा. रणदिवेवाडी यांचा समावेश आहे या सर्वांना कागल पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये आणले होते.