Fri, Nov 24, 2017 20:17होमपेज › Kolhapur › स्वतःच चिता रचून वृद्धेने संपवली जीवन यात्रा!

स्वतःच चिता रचून वृद्धेने संपवली जीवन यात्रा!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

कागल तालुक्यातील बामणी येथील एका 90 वर्षांच्या वृद्ध महिलेने आपल्या स्वतःच्या राहत्या घरातच आपली स्वताचीच चिता स्वतःच रचून पेटवून घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. नातेवाईकांना आणि कागल पोलिसांना सकाळी केवळ तिच्या अस्थीच शिल्लक राहिल्याचे दिसून आल्या. 

श्रीमती कलव्वा दादू कांबळे गेल्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. त्या राहत असलेल्या पत्र्याच्या घराकडे फारसे कोणी लक्ष देत नसत बाजूलाच जनावरांचा गोठा आहे. वृद्धा आपले काम आपणच करून जेवढे लागेल तेवढे अन्न तयार करून खात असत. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे वृद्धाने घराचे दार आतून बंद करून काही शेणी व लाकडे गोळा करून घेऊन व स्वतःच्या वापरात असलेल्या साड्या अंगाभोवती गुुंडाळून घेऊन स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. 

हा प्रकार कोणाच्या ही लक्षात आला नाही. नेहमीप्रमाणे वृद्धा घराबाहेर का आली नाही म्हणून शेजारी राहणार्‍या काही महिलांनी मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चौकशी केली. मात्र, दार उघडले नाही म्हणून काहींनी दार मोडले असता हा प्रकार पाहून अनेकांना धक्काच बसला.