Mon, Jul 13, 2020 11:08होमपेज › Kolhapur › कागल : केनवडे फाट्यावरील अपघातात गोरंबेतील एकाचा मृत्यू

कागल : केनवडे फाट्यावरील अपघातात गोरंबेतील एकाचा मृत्यू

Last Updated: May 23 2020 3:16PM
गोरंबे : पुढारी वृत्तसेवा  

कागल मुरगूड राज्य मार्गावर केनवडे फाटा (ता. कागल) येथील चौकात बस आणि मोटरसायकलच्या अपघातात गोरंबेतील संजय शिवाजी चोपडे यांचा मृत्यू झाला. तर अखिलेश कांबळे हे गंभीर जखमी झाले. 

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, केनवडे गोरंबे फाटा येथे इंडोकाऊन्टचे कामगार आणण्यासाठी आलेली बस (एमएच०९बीसी९२९७) ही केनवडे फाट्यावर आली. गोरंबेहून (एम. एच- ०९ .डी.डल्ब्यू ७३४२) या दुचाकीवरून एमआयडीसीकडे कामावर जात असलेले अखिलेश पोपट कांबळे (वय २६) व संजय शिवाजी चोपडे (वय ५०) हे दोघे दुचाकी गाडीवरून जात होते. केनवडे फाटा येथील चौकात आल्यावर दुचाकी गाडीला बसची धडक बसली. त्यामध्ये संजय चोपडे हे जागीच ठार झाले तर अखिलेश कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल केले आहे. चोपडे हे सावर्डे परिसरात तेल विकण्यासाठी जात होते. ते गरीब कुटुंबातील व मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या मृत्यृमुळे नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद कागल पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.