Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Kolhapur › राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:31PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहर परिसरात विविध संस्थांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. 

महापालिका 

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सुनील पाटील, नगरसेवक शेखर कुसाळे, प्रताप जाधव, अशोक जाधव, केएमसी कॉलेजचे प्राचार्य सुरेश गवळी, मुख्याध्यापिका अंजली जाधव, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते.  
परिवर्तन फौंडेशन

शिवाजी पेठ येथील प्रसाद हॉल येथे परिवर्तन फोैंडेशनतर्फे जिजाऊ जयंती साजरी झाली. अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमोल कुरणे, मनीषा घुणकीकर, राज कुरणे, परेश बनगे, जगन्‍नाथ कुरणे, अक्षय साळवी, महेश पाटोळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र हायस्कूल

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्था संचालक सी.डी. दिंडे, प्राचार्य ए.एस. रामाणे, उपप्राचार्य उदय आतकिरे, उपमुख्याध्यापक ए. एन. जाधव, टेक्निकल विभागप्रमुख बी.बी. मिसाळ, पर्यवेक्षक डी.बी. महावीर, उदय पाटील आदी  उपस्थित होते.

करवीर काशी फौंडेशन 

करवीर काशी फौंडेशनच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जे. बी. शिंदे तर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाहीर रंगराव पाटील यांनी जिजाऊंचा जीवनपट पोवाड्यातून उपस्थितांसमोर उलगडला. यावेळी उदयसिंह राजेयादव, प्राचार्य डॉ. सुरेश गवळी, माजी नगरसेवक धनाजी आमते, साहित्यिक बाबुराव शिरसाठ, रमाकांत आंग्रे, संभाजी जगदाळे उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेड  

भारतीय इतिहासात भूत, वर्तमान आणि भविष्य यांचे अनोखे परिवर्तन घडवून परिवर्तनाची भगवी पताका अखंड दख्खन मुलखी नाचवत अखेर संपूर्ण भारतभर मिरवली, अशा स्वराज प्रेरिका असणार्‍या राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने साजरी करण्यात आली.  ऐतिहासिक बिंदू चौक येथे आयोजित कार्यक्रमात रूपेश पाटील, धिरज चौगले यांच्यासह  रोहित मोरे, निहाल खान, अभिजित भोसले, अभिजित कांझर, मनोज नरके, अमित जाधव, आयेशा खान, संभाजी ब्रिगेडचे  कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

श्रीमंत जिजाऊ फौंडेशन 

श्रीमंत जिजाऊ फौंडेशनतर्फे सामाजिक उपक्रमातून जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथील नवजात मुलींना बेबी केअर कीट तसेच   मातांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्षा साक्षी पन्हाळकर, नम्रता शिंदे, रेश्मा मुजावर, रेवती घोरपडे, मिना शिंदे, जोत्स्ना खाडे, स्वाती तिबिले आदी उपस्थित होते.

विवेकानंद महाविद्यालयात लाठी काठीचे प्रात्यक्षिक 

विवेकानंद महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी झाली. जिजाऊ  जयंतीचे औचित्य साधून शिवकालीन युद्धकलेचे लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा आदी खेळांचे प्रात्यक्षिक विशाल माने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, डॉ. मंजुश्री घोरपडे उपस्थित होते.

सौ. शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल

विद्यापीठ सोसायटी संचलित सौ. शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल तपोवनमध्ये युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी मुख्याध्यापिका के. एम. जबडे, यू. आर. पाडळकर, वाय. ए. जाधव आदी उपस्थित होते.