होमपेज › Kolhapur › शेतमालाचे दर पाडण्याचे षड्यंत्र : खासदार शेट्टी

शेतमालाचे दर पाडण्याचे षड्यंत्र : खासदार शेट्टी

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 10:44PM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

ट्रॅक्टर-ट्रॉलीवरील आकारलेली जीएसटी केंद्र सरकारने त्वरित हटवावी, अशी मागणी खा. राजू शेट्टी यांनी आज केली. भ्रष्ट सरकारी अधिकारी व दलाल यांना हाताशी धरून शेतमालाचे दर पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सन 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांची अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी खा. शेट्टी यांनी ही मागणी केली. यावेळी कृषी, अर्थ, वित्तीय, व्यापार, संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी, सचिव तसेच कृषिमूल्य आयोगाचे आजी-माजी अध्यक्ष उपस्थित होते.

खा. शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भोंगळ कारभारावर तोफ डागली. देशामध्ये ऊस वगळता कोणत्यात पिकाला हमीभाव नाही. याला सरकारचे आयात-निर्यात धोरण, पायाभूत सुविधांचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले. सोयबीनचा हमीभाव 3050 रुपये असताना शेतकर्‍यांना केवळ दोन हजार ते 2200 रुपये या दराने विकण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले, सरकारची बाजारपेठ हस्तक्षेप योजनाच बकवास आहे.

महाराष्ट्रात नाफेड व एफसीआयमार्फत 5050 रुपये क्िंवटल या भावाने गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर 3200 ते 3800 रु. क्िंवटलच्या दराने विक्री होत आहे. परिणामी, तुरीचे दर पडले आहेत. 1450 रुपये क्िंवटलने खरेदी केलेले धान्य ऐन काढणीच्या हंगामात 1000 रुपये दराने विक्रीस काढले आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीवर 18 ते 28 टक्के जीएसटीची आकारणी केलेली आहे. पॉवर ट्रिलर व त्याचे स्पेअरपार्टस् विदेशातून आयात होतात. आयात कर आणि जीएसटी मिळून 35 टक्के कर भरावा लागत आहे. यामुळे सबसिडीपेक्षा करच जास्त आहे. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, जेणेकरून शेतकर्‍यांना दिलासा मिळेल.