Wed, Jan 23, 2019 23:19होमपेज › Kolhapur › पालकमंत्री-विनय कोरे यांची बंद खोलीत चर्चा

पालकमंत्री-विनय कोरे यांची बंद खोलीत चर्चा

Published On: Apr 09 2018 1:10AM | Last Updated: Apr 09 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांची रविवारी येथे शासकीय विश्रामगृहावर दीघर्र्काळ चर्चा झाली. बंद खोलीत झालेल्या या चर्चेत जिल्ह्यातील राजकीय स्थिती तसेच, मंत्रिमंडळ विस्तार याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. 

खरीप हंगाम आढावा बैठकीनिमित्त पालकमंत्री पाटील शासकिय विश्रामगृहावर होते. बैठक संपल्यानंतर तेथे विनय कोरे पोहोचले.  कोरे यांचा जनसुराज्य शक्‍ती पक्ष भाजप सरकारमध्ये घटक पक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांसह सरकारच्या धोरणांबाबत ना. पाटील आणि कोरे यांच्यात चर्चा झाली. याबरोबरच आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते.