Sat, Jul 20, 2019 23:38होमपेज › Kolhapur › बाजार समितीत गुळाला ६००१ रुपये उच्चांकी दर

बाजार समितीत गुळाला ६००१ रुपये उच्चांकी दर

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 1:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरी गुळाचे दर आणि गुणवत्ता घसरल्याची राज्यभर चर्चा सुरू असताना कोल्हापूरच्याच बाजार समितीत गुळाला 6001 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. यामुळे चांगला गूळ उत्पादित केल्यास व्यापारीही तितक्याच तोलामोलाने त्याला दरही देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांच्या फरकाने पुन्हा एकदा शाहूवाडी तालुक्यातील शेतकर्‍याने दराचा उच्चांक केला 
आहे.

22 जानेवारीला काढलेल्या सौद्यात शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथील लक्ष्मण तिरुखे या शेतकर्‍याच्या गुळाला 5757 इतका उच्चांकी दर मिळाल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. गुळाचे दर 2800 ते 3300 रुपयांपर्यंत खाली आले असताना अचानक एवढा दर कसा काय मिळाला, याबाबतही आश्‍चर्य व्यक्‍त होत होते.