Tue, Jan 22, 2019 20:37होमपेज › Kolhapur › शिवसमर्थ फिश मार्टचे उद्घाटन

शिवसमर्थ फिश मार्टचे उद्घाटन

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 10 2018 12:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिवंत आणि जातिवंत माशांचा अस्सल स्वाद देणार्‍या ‘शिवसमर्थ फिश मार्ट’चे शुक्रवारी दैनिक  ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्टेशन रोडवर सुरू झालेल्या या लाईव्ह फिश आऊटलेटमुळे कोल्हापूरच्या खवय्यांना जिवंत आणि जातिवंत माशांचा अस्सल स्वाद घेता येणार आहे.

शिवसमर्थ उद्योग समूहाच्या वतीने कोल्हापुरात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या या ‘फिश मार्ट’मध्ये विविध प्रकारचे ताजे मासे ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूरच्या खवय्यांसाठी ही आऊटलेट मोठी पर्वणी ठरेल, असा विश्‍वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. डॉ. जाधव यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलनाने या फिश मार्टचे उद्घाटन करण्यात आले. शिवसमर्थ उद्योग समूहाचे विशाल जाधव,  राहुल पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी नगरसेविका रूपाराणी निकम, संग्रामसिंह निकम, माजी नगरसेवक महेश वासुदेव, दत्तात्रय इंगवले, मत्सविकास विभाागचे सहआयुक्त दिलीप फडतरे, ए. बी. पाटील, अमोल पाटील, एस. जी. लाड, कल्लाप्पाण्णा आवाडे बँकेचे सहायक सरव्यवस्थापक नंदकुमार हावळ, व्यवस्थापक राजेंद्र खैरमोडे, सौ. तेजल जाधव, सुनीता पाटील, कांताबाई जाधव, श्रीमती उषा पाटील आदी उपस्थित होते.