Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Kolhapur › पासपोर्टसाठी वर्षभरात 87 हजार अपॉईंटमेेंट

पासपोर्टसाठी वर्षभरात 87 हजार अपॉईंटमेेंट

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:13AMकोल्हापूर : शेखर दुग्गी

महत्त्वाचा दस्तावेज असणार्‍या पासपोर्टसाठी वर्षभरात 87 हजार 852 ऑनलाईन अपॉईंटमेंट मिळाले आहेत. कोल्हापुरात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यापासून अर्ज करणार्‍यांच्या संख्येत वाढच होत आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दररोज 205 लोकांना पासपोर्टसाठी अपॉईंटमेंट मिळत आहे.

कोणत्याही देशातील नागरिकांना त्याची ओळख परदेशात पटवून देण्यासाठी तसेच आपला देश सोडून परदेशात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट हा आवश्यक परवाना आहे. परेदशात शिक्षण, नोकरी आणि फिरायला जाणार्‍यांची कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या वाढतच चालली आहे. पूर्वी महिन्याला 80 ते 100 लोकांची मुलाखतीसाठी पुणेवारी व्हायची. अनेकदा येण्या-जाण्याचा खर्च, वेळेचा व पैशाचा अपव्यव त्याचप्रमाणे पुणे येथे राहण्याचा खर्च यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागायचा. लोकांची हीच अडचण ओळखून केंद्र शासनाने विदेशी मंत्रालयाच्या वतीने पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गोवा रिझर्नमध्ये कोल्हापूर आणि सांगलीत हे केंद्र सुरू झाले. मार्च 2017 ते मे 2018 या कालावधीत 87 हजार 852 लोकांना पासपोर्टसाठी अपॉईंटमेंट मिळाले आहे. पासपोर्ट प्रक्रियेमध्ये सुलभता आल्याने काढणे सहज सोपे बनले आहे. 

आधारकार्ड हाच पुरावा

पूर्वी पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया खूपच किचकट असायची. आता कमीत कमी कागदपत्रांत पासपोर्ट काढून मिळत आहे. यात आणखी सुलभता आली आहे. आधार कार्डात पूर्ण जन्मतारखेची नोंद असल्यास पासपोर्ट सहज काढता येतो.