Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Kolhapur › जयसिंगपुरात ट्रक चालकाला लुटले

जयसिंगपुरात ट्रक चालकाला लुटले  

Published On: Mar 20 2018 6:51PM | Last Updated: Mar 20 2018 6:51PMजयसिंगपूर  : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसात कोल्हापूर येथील जयसिंगपूरमध्ये चोरी आणि लूटींच्या घटना वाढल्या आहेत. आज पहाटे बसस्थानकासमोर चहासाठी थांबलेल्या कर्नाटकातील ट्रक चालकाला तिघांनी मारहाण करून लुटले. या लूटमारीत ट्रक चालकांची चांदीची चेन, रोकड असा १८१० रुपयांचा मुद्देमाल संशयिताने पळविला.

या घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्यांच्या मुसक्या लगेच आवळल्या. पहाटे साडेचारच्या सुमारास ही लूटमार झाली होती. शामराव शिंगाडे, सागर सुभाष सूर्यवंशी  आणि अशोक रामा कांबळे (सर्व राहणार जयसिंगपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दुपारी या तिघांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

युसूफ हाजी करीम इनामदार (राहणार चितापूर, जिल्हा कलबुर्गी कर्नाटक ) हे पहाटे दोन अन्य ट्रक चालकासह जयसिंगपूर मार्गे मालट्रक घेऊन जात होते. पहाटे जयसिंगपूर बसस्थानकासमोर असलेल्या चहा टपरीवर तिघे थांबले होते. ते परत जात असताना बसस्थानकाच्या कंपाऊंडच्या भिंतीवर बसलेल्या संशयितांनी इनामदार यांना ट्रकमधून खाली खेचून बेदम मारहाण केली आणि त्यांना लुटले. रिक्षात बसून तिघेही उदगाव सांगलीच्या दिशेने गेले. मात्र जयसिंगपूर पोलिसांनी तिघांना तात्काळ जेरबंद केले.

 

Tags : kolhapur, kolhapur news, jaysingpur, jaysingpur crime, karnataka truck driver, looted, jaysingpur police