Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Kolhapur › कंत्राटी कामगारांकडून विनापरवाना पाणी विक्री 

कंत्राटी कामगारांकडून विनापरवाना पाणी विक्री 

Published On: May 12 2018 7:13PM | Last Updated: May 12 2018 7:13PMकुरुंदवाड(जि. कोल्‍हापूर) : प्रतिनिधी

कुरूंदवाड पालिकेच्या अग्निशामक विभागातील कंत्राटी कामगाराकडून कोणतीही पावती नसताना खासगी पाणी टँकरवाल्यांना खुलेआम विनापरवाना पाणी विक्री करत असतानाचा प्रकार आज उघडकीस आला.

शहरात नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधींना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या होणाऱ्या पाणीप्रश्नावरून सामोरे जावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या परस्पर पाण्यासारखी शासकीय मालमत्ता कंत्राटी कामगारांकडून चोरीने पाणी विकण्याचा हा निंदनीय प्रकार असल्‍याचे परिसरातून बोलले जात आहे. 

संबंधित कामगारांची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा पालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम कायदा सामाजिक संघटनेचे सुनील कुरूंदवाडे, आयुब पट्टेकरी, इम्तियाज बागवान यांनी दिला आहे.