Tue, Aug 20, 2019 04:42होमपेज › Kolhapur › ‘फ्रेंडशीप करणार का’ विचारणाऱ्यांना ‘पोलिसी खाक्या’

‘फ्रेंडशीप करणार का’ विचारणाऱ्यांना ‘पोलिसी खाक्या’

Published On: Dec 18 2017 4:07PM | Last Updated: Dec 18 2017 4:07PM

बुकमार्क करा

कुरूंदवाड : वार्ताहर

कुरूंदवाड येथील बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना माझ्याशी फ्रेंडशीप करणार का असे विचारणाऱ्यांविरोधात पीडित मुलीने निर्भया पथका कडे तक्रार केली. त्यानंतर निर्भया पथकाचा पोलिस उपनिरीक्षक पल्लवी यादव यांनी आपल्या पथकासह ३ रोडरोमीओंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली.

दरम्यान ही कारवाई सुरू असल्याचे पाहून सैनिक टाकळी बसमधून जात असताना काही विद्यार्थिनींनी पोलिस उपनिरीक्षक कुमारी यादव यांना दूरध्वनीवरून माहिती दिली.  मजरेवाडी रस्त्यावरील चौगुले पेट्रोल पंपावर बस अडवून हुल्लडबाजपणा करणार्‍या २३ रोडरोमियोंच्यावर ही दंडात्मक कारवाई केली. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. या कारवाईत ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

इचलकरंजीतील कुरुंदवाड येथे महाविद्यालयीन युवती आज सकाळी बारा सुमारास बसस्थानकावर बसची वाट पाहत होत्या. तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्या युवतीला ‘फ्रेंडशीप करणार का’ असे विचारत छेड काढली याची तक्रार दूरध्वनीवरून पीडित मुलींनी निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक कुमारी यादव यांच्या कडे दिली.  त्यानंतर उपनिरीक्षक कुमारी यादव आपल्या पथकासह  घटनास्थळी काही वेळातच दाखल झाल्या.  त्यांनी तीन रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवत न्यायालयात हजर करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

या दरम्यानच सैनिक टाकळीकडे जाणाऱ्या बसमध्ये मुलींची छेड काढत असल्याचा दूरध्वनी यादव यांना आल्यानंतर त्यांनी मजरेवाडी मार्गावरील चौगुले यांच्या पेट्रोल पंपानजीक सदरची बस थांबवून ते ऊस तेवीस हून अधिक रोडरोमिओंना बसमधून खाली उतरवत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांची चांगलीच फजिती केली. बसने नेहमी प्रवास करणाऱ्या बसमधील काही प्रवाशांनीही या रोडरोमिओंचा हुल्लडबाज पणा नेहमी चालत असल्याचीही तक्रार केली.

या रोडरोमिओंना कुरूंदवाड पोलिस ठाण्यात आणून त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. दरम्यान निर्भया पथकाची ही कारवाई तब्बल तासभर सुरू असताना रस्त्यावरून ये जा करणार्‍या नागरिकांनीही या ठिकाणी गर्दी केली होती. बस १ तासाहून अधिक वेळ थांबून असल्याने बसमधील प्रवाशांनी कोणतीच तक्रार न करता या कारवाईचे स्वागत केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक कुमारी पल्लवी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ. स्वाती कांबळे, आम्रपाली कांबळे, तृप्ती कांबळे सहभागी होते.