Tue, Jul 23, 2019 12:43होमपेज › Kolhapur › ...अन् पोलिसांचा सुटकेचा नि:श्‍वास 

...अन् पोलिसांचा सुटकेचा नि:श्‍वास 

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:55AM

बुकमार्क करा
इचलकरंजी : प्रतिनिधी 

पंचगंगा नदी तीरावरील डेक्कन जॅकवेलजवळ शेतात एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गावभागचे निरीक्षक मनोहर रानमाळे, शिवाजीनगरचे सतीश पोवार यांच्यासह पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पाहणी केली असता, युवक अतिमद्य प्राशन केल्यामुळे बेशुद्धावस्थेत होता.

पोलिसांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी इस्पितळात दाखल केले. खुनासारखा कोणताच गंभीर प्रकार  नसल्यामुळे 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. युवकाचा खून झाल्याची वर्दी रात्री आठ वाजता दिली होती. परिसर पिंजूनही मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे  पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.