Mon, Jul 13, 2020 00:15होमपेज › Kolhapur › इचलकरंजी : दारु पिऊन त्रास देणाऱ्या मुलाच्या डोक्यात आईने घातला वरवंटा 

दारु पिऊन त्रास देणाऱ्या मुलाच्या डोक्यात आईने घातला वरवंटा 

Last Updated: Jun 02 2020 11:35AM
इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी शहरानजिक असलेल्या कोरोची विवेकानंद नगरमध्ये एका आईने रागाच्या भरात दारु पिऊन शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या मुलाच्या डोक्यात वरवंटा घातल्याची घटना आज ( दि. २ ) उघडकीस आली आहे. ही घटना कोरोची मधील ३ विहीरीजवळ घडली. रवि शंकर तेलसिंगी  असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

दरम्यान, वरवंटा घातलेल्या रविची प्रकृती गंभीर झाली त्यामुळे त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहापूर पोलिसांनी मुलाच्या आईस ताब्यात घेतले आहे.