Tue, Mar 26, 2019 11:40होमपेज › Kolhapur › चंद्रपूरच्या चहांदे दाम्पत्याला पोलिस कोठडी

चंद्रपूरच्या चहांदे दाम्पत्याला पोलिस कोठडी

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 11 2018 1:13AMइचलकरंजी : प्रतिनिधी

जवाहरनगर येथील डॉ. अरुण पाटील याच्या दवाखान्यातून नवजात बालक खरेदीप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चंद्रपूर येथील अनिल चहांदे व प्रेरणा चहांदे दाम्पत्याला न्यायालयासमोर हजर केले. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. मुंबई येथील डॉक्टर अमोल सवाई आणि आरती सवाई यांच्याकडे पोलिसांनी आज चौकशी केली. सवाई यांनी दत्तक प्रक्रिया केलेली कागदपत्रे पडताळणीसाठी कोल्हापूर येथील बाल हक्क संरक्षण समितीकडे पाठवण्यात आली आहेत. 

डॉ. अरुण पाटील याच्या दवाखान्यातून कुमारिका मातेचे नवजात बालक चंद्रपूर येथील चहांदे दाम्पत्याने घेतल्याप्रकरणी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. चहांदे यांनी डॉ. अरुण पाटील याच्या दवाखान्यातून नवजात बालक घेतल्याचे, तसेच त्या कुमारिका मातेला दोन लाख रुपये दिल्याची कबुली दिली. 

डॉ. अमोल सवाई व आरती सवाई यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. डॉ. सवाई याने इचलकरंजी येथील रजिस्टर कार्यालयात दत्तक प्रक्रिया केली होती. शिवाय, या कागदपत्रांवर ज्या विधवा मातेकडून मूल घेण्यात आले आहे तिच्या सह्याही असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ही कागदपत्रे पडताळणीसाठी कोल्हापूर येथे पाठविली आहेत. याचा अहवाल मिळेपर्यंत सवाई दाम्पत्याला इचलकरंजीतून बाहेर जाऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत. 

डॉ. पाटील याच्या दवाखान्यातील बोर्डवर डॉ. एस. एम. कोडोलीकर यांचे नाव होते. डॉ. पाटील याला अटक केल्यानंतर चौकशीसाठी कोडोलीकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्याकडे योग्य ती चौकशी करता आला नव्हती. पोलिसांनी शनिवारी पुन्हा कोडोलीकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांचा शनिवारी जबाब घेण्यात आला. डॉ. कोडोलीकर यांचा जबाबही महत्त्वाचा ठरणार आहे.