Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Kolhapur › हुपरीत २ गटात हाणामारी                          

हुपरीत २ गटात हाणामारी                          

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:37AM

बुकमार्क करा
रेंदाळ : हुपरी येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेने शिवाजीनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण असून याची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. परस्परविरोधी फिर्याद नोंदवण्याचे काम दोन्ही गटाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हुपरी माळ भागावरील शिवाजीनगर येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाकडून काठ्या, दगडांचा सर्रास वापर करण्यात आला. फिर्याद नोंदवणे सुरू असतानाच पोलिस ठाण्याच्या आवारातच एका गटाने दुसर्‍या गटातील तरुणावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. पोलिस स्टेशनच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.