Wed, Nov 21, 2018 05:11



होमपेज › Kolhapur › जाणून घ्या 100 टक्के स्मरणशक्‍तीचे रहस्य

जाणून घ्या 100 टक्के स्मरणशक्‍तीचे रहस्य

Published On: Apr 16 2018 12:28AM | Last Updated: Apr 15 2018 10:55PM



कोल्हापूर : प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सतत अपडेट राहणे आवश्यक बनले आहे.  सध्या मुलांमध्ये एकाग्रतेचा आणि स्मरणशक्‍तीचा अभाव ही शिक्षक आणि पालकांची तक्रार आहे. यासाठी मुलांची स्मरणशक्‍ती वाढावी, ते अधिक बुद्धिमान व्हावेत या हेतूने  दै. ‘पुढारी’ अंकुर क्‍लब आणि ऋषी संस्कृती विद्या केंद्र यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘हंड्रेड पर्सेंट मेंमरी प्रोगाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.19) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सातवी ते दहावीतील विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांच्यासाठी असणारा हा कार्यक्रम मोफत आहे. या कार्यक्रमांतून एकाग्रता आणि स्मरणशक्‍ती कशी वाढवावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

हंड्रेड पर्सेंट मेमरी प्रोगाम ही नवी आणि अधिक परिणामकारक असामान्य पद्धत आहे. या कलेद्वारे आपला पाल्य कोणत्याही विषयाचा त्वरित आढावा घेऊ शकतो. त्याने जे काही अभ्यासले असेल ते सर्व त्याच्या आयुष्यभर लक्षात ठेवू शकतो. प्रत्येक विषयाची उजळणी अवघ्या 5 ते 10 मिनिटांत करू शकतो,थोड्या वेळाच्या उजळणीने विषय सहजरीत्या आणि जसाच्या तसा म्हणून दाखवणे शक्य आहे. परीक्षेबाबतची मनातील भीती नष्ट करणे आदी शक्य होते. तसेच 200 पानाच्या पुस्तकातील संपूर्ण विषयाचा आढावा दोन मिनिटांत घेतला जाऊ शकतो. या कलेद्वारे मानवी मेंदू एखादे चित्र पाहून त्यातील घटक सेकंदाच्या दशलक्षांश इतक्या कमी वेळेत आठवण्याची क्षमता धारण करतो. वर्षभराचा अभ्यासक्रम 100 टक्के स्मृतीने एक महिन्यात पूर्ण करता येतो. हे कोणत्या संकल्पनेतून साध्य होते याची माहिती या कार्यक्रमातून होणार आहे.  या कार्यक्रमाचे पासेस टोमॅटो एफ एम कार्यालय आणि ज्ञानयोग मंदिरम ऋषी संस्कृती विद्या केंद्र राजारामपुरी, 6 वी गल्‍ली येथे उपलब्ध आहे. संपर्क 7676909280, 9422581977, 8805024242. कार्यक्रमाचे पासेस घेण्यासाठी येताना सोबत आपल्या पाल्याचे शाळेचे आयकार्ड घेऊन येणे आवश्यक आहे.