Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › शहरवासीयांचा इको फ्रेंडली होळीकडे कल

शहरवासीयांचा इको फ्रेंडली होळीकडे कल

Published On: Mar 01 2018 1:39AM | Last Updated: Feb 28 2018 11:57PMकोल्हापूर : प्रतिनिधी

होळी पेटवण्याचा सण आपल्याकडे रूढ आहे; पण आता काळ बदलला आहे. सण आणि उत्सव हे आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत हे खरे आहे; पण होळी पेटवताना पर्यावरणाचा कसलाही र्‍हास होऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी. तसेच होळीच्या धुरामुळे श्‍वसनाचे रोग आणि प्रदूषण वाढणार नाही याचाही साकल्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तरुण मंडळे आणि सामाजिक संस्थासह तरुणाई इकोफ्रेंडली होळीसाठी प्रयत्न करताना मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. आपणही इको-फ्रेंडली होळी साजरी करण्यासाठी हातभार लावूया.

शेणी आणि लाकूडफाट्याचा वापर करून आपल्याकडे होळी पेटवण्याची प्रथा रूढ आहे. या होळीमध्ये एरंडाच्या फांदीचा आणि मोठ्या होळीत झाडाचा वापर केला जातो.  वृक्षतोडीमुळे उष्णता वाढत आहे. पर्यावरणाचा र्‍हास सुरू आहे. याचा परिणाम प्रदूषण आणि त्यामुळे थेट मानवी आरोग्यावर परिणाम दिसू लागला आहे.