Tue, Apr 23, 2019 01:46होमपेज › Kolhapur › अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांच्या वर्चस्ववादातून दंगली : अ‍ॅड. आंबेडकर

दलितांचा राजा होतो; पुढेही राहीन : अ‍ॅड. आंबेडकर

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 2:50PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनाच्या वर्चस्ववादातूनच राज्यात दंगली घडल्याच्या आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केला. मराठा-दलित असा वादच नाही. मात्र, त्यांच्यात गैरविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, शासनाने ते प्रथम थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला कोल्हापुरात हिंसक वळण लागले होते. या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅड. आंबडेकर आज कोल्हापूर  दौर्‍यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,  भीमा कोरेगाव येथील शौर्यदिनाच्या कार्यक्रमानंतर परतणार्‍या हजारो दलित बांधव, महिला, मुलांवर दगडफेक झाली, वाहने पेटवण्यात आली. हे करणार्‍यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यात तीन जानेवारीला बंद पुकारण्यात आला होता. त्याला हिंसकच वळण लागावे असा जाणीवपूर्वक प्रयत्न काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला. देशात काही संघटनांचे स्लीपर सेल आहेत. राज्यात जिथे जिथे संधी मिळेल, त्या ठिकाणी हे स्लीपर सेल बाहेर पडतात, अशी कृत्ये घडवून आणतात. शासनाला याची सर्व माहिती आहे; पण कारवाई होत नाही. 

देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्यावरून हिंदुत्ववादी संघटनांत नियंत्रित व अनियंत्रित असे दोन गट आहेत. त्यातून अनियंत्रित संघटनांकडून अशी कृत्ये होत आहेत. केंद्र व राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जाहीर केले  आहे. चौकशी करणारे न्यायमूर्ती रबर स्टॅम्प नकोत, ते दलितही नको. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे न्यायाधीश देतील ते मान्य असतील, असेही त्यांनी सांगितले.

आपण दलितांचा राजा  होतो आणि पुढेही राहीन

दलित चळवळीच्या नेतृत्वाबाबत बोलताना, आपण दलितांचा राजा  होतो आणि पुढेही राहीन. माध्यमांनी जे पेपर्स टायगर्स तयार केले, ते तुमच्याकडेच राहू द्या, असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना डॉ. आंबेडकर यांनी टोला लगावला.

 

वाचा संबंधित बातम्या

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांचा धोकाः आंबेडकर

कोरेगाव भीमाच्या घटनेमागे मराठा संघटनांचा हात: रामदास आठवले 

प्रकाश आंबेडकर राजे..आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर

सोशल मीडियावर आंबेडकर विरुद्ध आठवले